Home प्रशासकीय विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी यांनी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन आणि तुमचे संपूर्ण...

विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी यांनी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन आणि तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन,” अशी उघड धमकी दिली

0
77

आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी यांनी खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन आणि तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन,” अशी उघड धमकी दिली

DDK न्यूज – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका अत्यंत संतापजनक व्हिडिओमुळे मुंबई पोलीस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना, “पुन्हा दिसलात तर खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन आणि तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करेन,” अशी उघड धमकी दिली होती. आंदोलनात सहभागी होणाऱ्या किंवा निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या एनडीपीएस (NDPS) किंवा ड्रग्सच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभाग आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे.विरोधक आणि विविध सोशल मीडिया हँडल्सवरून हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. विद्यार्थी आंदोलकांवर व नागरिकांवर दबाव आणण्यासाठी खाकी वर्दीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

वरिष्ठांचे तात्काळ आदेश आणि चौकशी: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिमंडल उपआयुक्तांनी (DCP) या प्रकरणाच्या तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत पोलीस अधिकाऱ्याचे वर्तन शिस्तीला व नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गृह विभागाने त्याला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here