जंक फूडमुळे विद्यार्थ्यांनची एकाग्रता,स्मरनणशक्ती आणि आरोग्य धोक्यात – तुकाराम मुंढे
निरोगी विद्यार्थी, सक्षम नागरिक, सशक्त राष्ट्र
DDK न्यूज – शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सहज उपलब्ध होणारे अति साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थ मुलांच्या आरोग्यावरच नव्हे, तर त्यांच्या एकाग्रतेवर, स्मरणशक्तीवर, शारीरिक विकासावर आणि भविष्यातील जीवनमानावर परिणाम करतात.
आज जगभरात जीवनशैलीजन्य आजारांचे वय झपाट्याने कमी होत आहे. त्याची सुरुवात अनेकदा बालपणातील चुकीच्या आहाराच्या सवयींपासून होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना हीच सर्वात प्रभावी सार्वजनिक आरोग्य नीती आहे.
याच दृष्टीने महाराष्ट्रात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या परिसरातील ५० मीटरच्या परिघात जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उद्देश एकच: शाळेचा परिसर हा आरोग्यदायी सवयी घडवणारा परिसर असावा.
ही पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन, विक्रेते आणि समाज या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.






