वाढदिवसानिमित्त वृक्षरोपांची लागवड ; हरित सांगोला अभियानात युवा उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील यांचा सहभाग
सांगोला प्रतिनिधी –
सांगोला नगरपालिका व नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवा उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपालिकेला वृक्षरोपांचे वितरण केले.
त्याच दिवशी काल गुरुवारी एसटी बस स्थानकाच्या भिंती लगत नगराध्यक्ष आनंद भाऊ माने, युवक नेते डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील, नगरसेवक काशिलिंग (बाबू) गावडे, साहिल भाई इनामदार, गरंडे, बापू देवकते, आरिफ भाई मुलांनी व प्रमोद दादा साळुंखे पाटील मित्र परिवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सांगोला शहराच्या हरितक्रांती अभियानाला हातभार लागला. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि शहर अधिक हिरवेगार करण्याच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रमोददादा साळुंखे-पाटील यांनी नगरपालिकेकडे वृक्षरोपे सुपूर्द केली.
यामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी घेतलेला पुढाकार निश्चितपणाने सांगोला वेगळे स्वरूप प्राप्त करून देत आहे.
यावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत, वाढदिवसानिमित्त भेटवस्तूंऐवजी वृक्षरोपे देण्याची संकल्पना समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
नागरिकांनीही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शहराच्या हरित विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन नगरसेवक काशिलिंग बाबू गावडे यांच्या वतीने करण्यात आले.






