Home राज्य महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई

महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई

0
268

विद्यार्थ्यांकडून उठलेल्या विरोधाच्या आवाजानंतर दिल्ली पोलीस आणि प्रशासनाला मोठी कारवाई

नवी दिल्ली DDK न्यूज : जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान महिला आंदोलनकर्त्यावर हात उचलणे दिल्ली पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप आणि विद्यार्थ्यांकडून उठलेल्या विरोधाच्या आवाजानंतर दिल्ली पोलीस आणि प्रशासनाला मोठी कारवाई करणे भाग पडले आहे.

दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेच्या कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे अधिकारी दिल्ली पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस उपआयुक्त संदीप लांबा असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स, विशेषतः Gen-Z युजर्सनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी लावून धरली. वाढत्या दबावानंतर संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here