सांगली (प्रतिनिधी)- आज सांगली येथे Nikon इंडिया तर्फे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर चेतन पाल सर यांचे सिनेमॅटोग्राफी या विषयावरील विशेष वर्कशॉप उत्साहात पार पडले.
या वर्कशॉपला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील सुमारे ७५ फोटोग्राफर्स बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.
श्री. चेतन पाल सर यांनी लाईव्ह मॉडेल शूट करून त्यावरील एडिटिंग ऑन द स्पॉट प्रात्यक्षिकासह सादर केले. त्यामुळे उपस्थित फोटोग्राफर्सच्या अनेक शंका व तांत्रिक अडचणींचे निरसन झाले तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले.
या वर्कशॉपसाठी Nikon इंडिया चे नीरज सर, अमित सर, विकास सर, मजहर सर व राहुल सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर वर्कशॉपचे आयोजन सन आर्ट चे संजय सारडा व शरद सारडा यांनी केले होते. तसेच बालाजी मीडिया यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.
शरद सारडा यांनी या यशस्वी आयोजनासाठी सर्व उपस्थित फोटोग्राफर्स, मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.






