Home राज्य तुकाराम मुंढे यांची FDA मध्ये धडाकेबाज बाज एंट्री

तुकाराम मुंढे यांची FDA मध्ये धडाकेबाज बाज एंट्री

0
36
  1. DDK न्यूज:- तुकाराम मुंढे यांची FDA मध्ये धडाकेबाज बाज एंट्री खरच भविष्य काळाची गरज वाटतेय –

अन्न व औषध प्रशासन विभाग वर्षानुवर्षे कुंभकर्ण झोपी गेलेला विभाग अखेर जागा झाला
एक सनदी अधिकारी गेल्या काही दिवसापासून अख्या महाराष्ट्रात जो कारवाईचा बडगा उचला आहे त्यामुळे भेसळयुक्त काम करणाऱ्या नारधमांची चांगलीच दमछाक झाली आहे.तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील एक प्रामाणिक अधिकारी असून त्यांनी आणखी एकदा अख्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे की एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो.
आज पर्यंत फक्त कागदावरच गुटके बंदी होती, राज्यातील काना कोपरा असा पाहायला मिळणार नाही की तिथं चोरून गुठका विक्री केली जात नाही.हप्तेखोरी आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या जीवावर अवाढव्य काळी यंत्रणा राजरोज पणे सुरू होती.
आज बेकायदेशीर पणे गुटखा विकणाऱ्या टपऱ्या बंद केल्या जात आहे केवळ तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या दहशत पाहून .
अनेक वर्षे झाली लहान मुलांच्या दुधात विष मिसळून स्वतःची घरे भरणारी नराधम गेली काही दिवसापासून भेसळयुक्त दुधाचे टँकर आहे त्या स्थिती मध्ये सोडून घावेल त्या वाटेने पळ काढताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षे केमिकल युक्त दूध विकून करोडरूपायची मोहमाया जमा केली. अक्षरशः शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती नांगर फिरवला आता त्याचं लांडग्यांची झोप उडाली आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे शेतकरी राजाला दुधाचा चांगला भाव आणि नागरिकांना चांगलं दूध मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुकाराम मुंढे एक निडर अधिकारी जे कोणाच्या दबावाखाली काम करत नाहीत, प्रत्येक कारवाईच्या मागे धमकी असते अश्या शब्दांना भिक न घालता ते कारवाई करतात. आज पर्यंत 25 बदल्या ही त्यांच्या कामाची पोहच पावतीच म्हणावे लागेल.अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आणि पद कुठले ही असुध्या हा माणूस कधी झुकला नाही. प्रामाणिक पणा आज देखील सुटला नाही.
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोर, नियमबाह्य औषध विक्रेते आणि अनधिकृत अन्नपदार्थ व्यापाऱ्यांविरुद्ध धडक व कठोर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
त्यांच्या प्रमुख कारवाया खालीलप्रमाणे आहेतः
दूध भेसळीवर कारवाई: महाराष्ट्रात दुधात होणारी भेसळ
रोखण्यासाठी व काळे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अन्नपदार्थावर धाडीः पुणे, संभाजीनगर, धाराशिव, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत छापे टाकून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा (आंबे, तूप, खवा, गुळ, खाद्यतेल इ.) जप्त करण्यात आला आहे.
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देण्यास बंदी: वडापाव, भजी
यांसारखे उघडे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात (News Paper) गुंडाळून देणाऱ्या विक्रेत्यांवर आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव कारवाईचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here