Home सोलापूर माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत सांगोला नगरपरिषदेचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत सांगोला नगरपरिषदेचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम

0
70

आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य पर्यावरणीय भेट

सांगोला : दिनांक 11 ऑगस्ट, वार मंगळवार. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रात वाढ, जैवविविधतेचे संरक्षण आणि शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्याच्या उद्देशाने ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत सांगोला नगरपरिषदेकडून जूना पारे रोड, येथे नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी साहेब व उपनगराध्यक्ष मा. नितीन इंगोले व उपस्थित नागरिक यांच्या हस्ते वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला.
वाढते शहरीकरण, वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करणे तसेच लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने सांगोला नगरपरिषदेकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणे, उपलब्ध मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला तसेच आवश्यक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत आहे.

‘केवळ वृक्षलागवड नव्हे, तर प्रत्येक लावलेले झाड जगविणे’ या संकल्पनेवर नगरपरिषदेकडून विशेष भर देण्यात येत आहे. लागवड केलेल्या रोपांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा व संरक्षण करण्यात येत आहे.

वृक्षांमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास, तापमान नियंत्रित राहण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यास तसेच जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मोठी मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाला सामाजिक जबाबदारी मानून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

या पर्यावरण संवर्धन उपक्रमास मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. आनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यावरणपूरक व हरित शहर निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे.

तसेच उपनगराध्यक्ष मा. नितीन इंगोले यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यात येत आहे.
लोकसहभागातून हा उपक्रम व्यापक चळवळ बनवून सांगोला शहर अधिक स्वच्छ, सुंदर, हिरवेगार व पर्यावरणपूरक करण्याचा नगरपरिषदेचा संकल्प आहे.

‘स्वच्छ सांगोला – सुंदर सांगोला – हरित सांगोला’ या संकल्पनेला बळ देत ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध आहे.

“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली अमूल्य पर्यावरणीय भेट!”
आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

या पर्यावरण संवर्धन उपक्रमास मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here