Home राजकारण जंतर मंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाटीचार्ज निषेधार्थ 23 जुलै ला मुंबई बंद ॲड....

जंतर मंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाटीचार्ज निषेधार्थ 23 जुलै ला मुंबई बंद ॲड. प्रकाश आंबेडकर

0
139

२३ जुलै – महाराष्ट्र बंद विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी… लोकशाहीच्या रक्षणासाठी… संविधानाच्या सन्मानासाठी

मुंबई प्रतिनिधी – आज प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यांचा नाही… प्रश्न लोकशाहीचा आहे.उद्या अन्याय तुमच्या मुलांवर झाला, तर त्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार?

जात, धर्म, पक्ष यापलीकडे जाऊन विचार करा. शिक्षण, रोजगार आणि संविधानिक अधिकारांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.

हा बंद कोणत्याही पक्षासाठी नाही, तर लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी आहे.दिल्लीत शांततेच्या मार्गाने आपला आवाज मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला… त्यांच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या, अश्रुधूर सोडण्यात आला, शेकडो जण जखमी झाले.आज गप्प बसणारे उद्या अन्यायाचे पुढचे बळी ठरू शकतात.

२३ जुलै – महाराष्ट्र बंद विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी… लोकशाहीच्या रक्षणासाठी… संविधानाच्या सन्मानासाठी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here