Home प्रशासकीय २३ जून रोजी एकल महिला दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन – सांगोला नगरपरिषद...

२३ जून रोजी एकल महिला दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन – सांगोला नगरपरिषद सांगोला

0
133

एकल महिला दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी) :- नगरपरिषद सांगोला यांच्या वतीने दिनांक २३ जून २०२६, मंगळवार रोजी एकल महिला दिवस साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने सकाळी १०.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना, हक्क व सुविधा यांची माहिती या कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या समस्या, गरजा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

नगराध्यक्ष श्री. आनंदाभाऊ माने, महिला व बालकल्याण सभापती सौ. छायाताई मेटकरी तसेच मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी नगरपरिषद हद्दीतील सर्व एकल महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here