माने क्लासेस चा विद्यार्थी कु.सर्वज्ञ दत्तात्रेय कसबे भारतीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत राज्यात चौथा
सांगोला प्रतिनिधी – राज्यस्तरीय भारतीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये कुमार सर्वज्ञ दत्तात्रेय कसबे याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.

सांगोला शहरातील माने क्लासेस मधील तर सांगोला प्राथमिक विद्यालय सांगोला इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. सर्वज्ञ दत्तात्रय कसबे याने राज्यस्तरीय भारतीय प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये 200 पैकी 194 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक तर मंथन प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा मध्ये 150 पैकी 134 गुण मिळवून राज्यात नववा तर जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
सदर विद्यार्थ्यांचा सत्कार सोलापूर दूध संघाचे संचालक,सांगोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड .मारुती ढाळे ,सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या संजीवनी लॅब चे मालक महादेव कोळेकर तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे सीनिअर कॉलेज क्लर्क अमोल गाडे त्यांच्या पत्नी ॲड.प्रतीक्षा अमोल गाडे यांनी सर्वज्ञ दत्तात्रेय कसबे या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.






