पंतप्रधान मोदीची गो माता चारा पाण्या विना वंचित..
मुंबई (प्रतिनिधी)- मुंबई शहरात गेल्या अनेक दशकांपासून राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमाती उदरनिर्वाहासाठी गाई पाळतात. या गाई मुंबईतील विविध ठिकाणी असणारी हिंदू प्रार्थना स्थळे, हिंदू मंदिरे,जैन देरासर आदीच्या समोर किंवा आजूबाजूला गाय चरण्यासाठी उपलब्ध करून देतात.हिंदू धर्मातील चालीरीती,परंपरा,व्रत- वैकल्य,
करिता भाविक,भक्त हे आपल्या आपल्या भावाने प्रमाणे त्याना नैवेद्य किंवा अन्य भोजन खाऊ घालतात. किंबहुना त्या गाईची मनोभावे पूजा करतात.
हिंदू धर्मातील विशेष सण उस्तावात गाईला फार महत्व आहे.
आज राज्यात आणि केंद्रात असणार शासन हे कट्टर हिंदुत्व वादी असल्याचे सिद्ध करित आहे. गाईला आपली आई मानत आहे. अशा वेळी अनेक दशक ज्या गाईला दिवस रात्र पोटच्या पोरापेक्षा अधिक जास्त महत्व दिले.ज्याचा सांभाळ केला. अशा निराधार,निराश्रित,विधवा अशिक्षित,बेरोजगार महिलांना (लाडक्या बहिणीना )उपाशी मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच सरकार करत आहे. गाई साठी जातीय द्वेष भडकवणारे,समाजमाध्यमाच्या आडून खोटी अकाउंट निर्माण करून समाजाच्या परिघाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना आता उपाशी मारण्याचे पाप मुंबई महानगरपालिका पोलिसांच्या आडून करित आहे.
तरी ही गंभीर बाब पोलीस उप आयुक्त मान. महेंद्र पंडित साहेब यांना भेटून त्याना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली आहे.
या संबंधित मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त यांच्या निदर्शनास देखील आणून दिली जाणार आहे.
असे विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रतीक कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. निवेदन देताना सोबत सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव आणि निकेश कदम,किरण निकम आणि शेकडो महिला कार्यकर्ते उपस्थित होते.






