Home सोलापूर मुख्यधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

मुख्यधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
88

सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त लिंगायत स्मशानभूमी व यल्लमादेवी मंदिर परिसर येथे सांगोला नगरपरिषदेकडून वृक्षारोपण

सांगोला प्रतिनिधी-
13 जून वार सोमवार रोजी दुपारी 12.30 वाजता सांगोला नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मा. डॉ. सुधीर गवळी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला नगरपरिषदेकडून, सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये मोठ्या उत्साहात वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि येत्या पाच वर्षात एक लाख वृक्ष लागवड करून शहर हिरवेगार करण्याचा संकल्प करत, सांगोला येथील लिंगायत स्मशानभूमी, जुना मेडशिंगी रोड व यल्लमा देवी मंदिर, माळवाडी रोड परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.


याप्रसंगी उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, गटनेते प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर तेली, महिला व बालकल्याण सभापती छायाताई मेटकरी, सदस्या आशादेवी यावलकर, सदस्य काशिलिंग गावडे, यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. तसेच लिंगायत समाजाकडून मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचा शाल व पुषगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच म.वी. अध्यक्ष रत्नकर पाटणे महात्मा बसवेश्वर संघटना अध्यक्ष सुमित चांदणे, मनोज उकळे सर, अमर दादा लोखंडे, निलेश नष्टे ,संतोष महिमकर यांनीही वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला.
तसेच या प्रसंगी नगरपरिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी महेश राजपूत, सिटी कोऑर्डिनेटर अजितकुमार पवार व वृक्ष प्राधिकरण विभाग आरिफ मुलाणी यांच्यासह सांगोला नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here