Home सामाजिक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ९८१ रक्तदात्यांचे रक्तदान

0
3
  • सांगोला (प्रतिनिधी)
    रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष,लायन्स माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये २० मे लोणविरे १३८,२१ मे नाझरा १६५ व २२मे २०२६ कोळा येथे १४१ व सांगोला ५३७ असे एकूण ९८१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य केले.
    सांगोला येथील शिबिराचे उद्घाटन लायन्स विभागीय सभापती ॲड.ला.श्रीनिवास कटकुर, उपविभागीय सभापती ला.सोमशेखर भोगडे, नगराध्यक्ष आनंदा माने,शिक्षण,सा.ता.उ.शि.मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांचे हस्ते व डॉ.शैलेश डोंबे,माजी नगराध्यक्ष सुहास होनराव,उद्योगपती विलास क्षीरसागर,कॅबिनेट ऑफिसर सी.ए.उत्तम बनकर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य बिभीषण माने, उपमुख्याध्यापक चारूदत्त जगताप,सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा.नवनाथ बंडगर, यांच्या उपस्थितीत फीत कापून व श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन झाले.
    या शिबिरासाठी संस्था उपाध्यक्ष ॲड विजयसिंह चव्हाण,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सदस्य दिगंबर जगताप,प्रसाद झपके, विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त व विद्यमान प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here